You are currently viewing ” स्वतःवर विश्वास ठेवून मार्गक्रमणा करा – कवी विजय सावंत

” स्वतःवर विश्वास ठेवून मार्गक्रमणा करा – कवी विजय सावंत

” स्वतःवर विश्वास ठेवून मार्गक्रमणा करा – कवी विजय सावंत

मुंबई

” स्वतःवर विश्वास ठेवून मार्गक्रमणा करा, आपल्यातील सामर्थ्य ओळखा, वैग्युण्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. यशासाठी आडमार्गाचा वापर करू नका, सतत प्रयत्नशील राहा, यश तुमचेच आहे ” असे उद्गार कवी विजय सावंत यांनी काढले.धर्मविर संभाजी विद्यालय, विक्रोळी येथील येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सदिच्छा समारंभानिमित्त ते विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधतांना बोलत होते.

विक्रोळी येथील अमृतवेल संस्थेने सन 1991 साली कै.विलासराव टेकवडे व श्री.श्रीकृष्ण पाटील,अशोक पाटील, शंकर पाटील यांनी एकत्र येऊन धर्मवीर संभाजी विद्यालयाची स्थापना केली. आज या शाळेतील इयत्ता दहावीची पंचविसावी तुकडी परिक्षेला सामोरी जात आहे.आजुबाजुच्या भागातील गोरगरीब पालकांच्या मुलांना चांगलं शिक्षण मीळावं म्हणून बालवाडीपासून सुरू केलेल्या या शाळेचा आज वटवृक्ष होत आहे. अपवाद वगळता या शाळेचा निकाल सतत नव्वद टक्केपेक्षा जास्त लागलेला आहे. चार-पाच वेळा शंभर टक्के निकालही लागलेला आहे. या शाळेतील काही मुले, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, तसेच MPSC. परीक्षेत उत्तीर्ण होऊन आज जीवनाच्या आकाशात उंच भरारी मारतांना दिसतात.सदर शाळेतील शिक्षक श्री.प्रदीप गावडे सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावून वाॅर्ड, जिल्हा व राज्यस्तरावरील अनेक बक्षिसे मिळवून दिली आहेत.
कब्बड्डी सारख्या खेळात या शाळेतील मुलांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे.या प्रसंगी नुकतेच रशियातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आलेल्या पायल परमेश्वर कांबळे नावाच्या विद्यार्थीनीचा संसथेचे संस्थापक अध्यक्ष श्री.श्रीकृष्ण पाटील व प्रमुख पाहुणे विजय सावंत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका किशोरी रावराणे मॅडम,पर्यवेक्षक श्री.वसंतराव जोंधळे सर,रसीका भोपरबळे,माळी सर, प्रदीप गावडे सर, इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी खुप परिश्रम घेतले. याप्रसंगी इयत्ता नववी, दहावीचे विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे रसाळ सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक श्री.बंडू माळी यांनी तर आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षिका सौ.सायली गोळे मॅडम यांनी केले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा