You are currently viewing जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत श्रेया खोत व जान्हवी पाटील प्रथम 

जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत श्रेया खोत व जान्हवी पाटील प्रथम 

सावंतवाडी :

मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर तर्फे प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरी कथाकथ स्पर्धेच्या लहान गटात आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस च्या श्रेया श्रीकृष्ण खोत हिने तर मोठ्या गटात राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडीच्या जान्हवी विश्वास पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला.

पाचवी ते सातवी लहान गटात द्वितीय – पार्थ उमेश सावंत (राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी) तृतीय – हर्षदा गणेश जोशी (गजानन विद्यालय, पाट) उत्तेजनार्थ – पूर्वा शत्रुघ्न मुळीक (आरोस पंच. विद्या विकास हायस्कूल, आरोस) प्रांजल सतीश तेरसे (कुडाळ हायस्कूल) यांनी यश मिळविले. व आठवी ते दहावी या मोठ्या गटात द्वितीय – करिश्मा पंकज मांजरेकर (मदर क्वीन्स, सावंतवाडी) तृतीय – हर्षिता सहदेव राऊळ (मळगाव इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) यांनी यश मिळविले.

स्पर्धेचे उदघाटन स्व.प्रा.रमेश कासकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्षहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वाचन मंदिराचे अध्यक्ष मा. महेश खानोलकर, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर तसेच परीक्षक प्रा. एन. डी कार्वेकर, श्री. प्रकाश तेंडोलकर, सौ. स्मिता नाईक, सौ. नेहा मेस्त्री उपस्थित होते.

परीक्षक म्हणून प्रा.एन. डी. कार्वेकर, श्री. प्रकाश रुपाजी तेंडोलकर, सौ. स्मिता रवींद्र नाईक, सौ. नेहा मेस्त्री यांनी काम पहिले यावेळी स्पर्धेच्या निमित्ताने परीक्षक प्रा. एन. डी. कार्वेकर, व प्रकाश तेंडोलकर यांनी उपस्थित विद्यार्थांना मौलिक मार्गदर्शन केले. तसेच स्व.रमेश कासकर यांच्या बद्दलच्या आठवणीना उजाळा दिला.

विजेत्या सर्व स्पर्धेकांना प्रशस्तीपत्र, ग्रंथभेट, तसेच रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेच्या सुरुवातीला यापूर्वी वाचन मंदिर तर्फे घेण्यात आलेला श्री.दत्ताराम सडेकर पुरस्कृत निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम – तेजस्वी शैलेंद्र सगम (राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी) द्वितीय – वेदांती सत्यवान नवार (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा) तृतीय- स्वराली गजानन गवस (मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव) उत्तेजनार्थ – योगिता विलास राऊळ (राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी) वैभवी गोविंद परब (मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव) यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र ग्रंथभेट व रोख पारितोषिक देवून गौरविण्या आले.

स्पर्धेला ग्रंथालयाचे संचालक हेमंत खानोलकर, शांताराम गवंडे, चंद्रकांत जाधव, माजी संचालक बाळकृष्ण मुळीक कर्मचारी वर्ग तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थि मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यवाह सौ. स्नेहा खानोलकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा