You are currently viewing सुभेदार यांनी पूर्वीच राजीनामा दिला, उचलबांगडी म्हणणे हास्यास्पद…

सुभेदार यांनी पूर्वीच राजीनामा दिला, उचलबांगडी म्हणणे हास्यास्पद…

सुभेदार यांनी पूर्वीच राजीनामा दिला, उचलबांगडी म्हणणे हास्यास्पद – सहकाऱ्यांकडून स्पष्टीकरण;

सावंतवाडी

पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीमुळे आशिष सुभेदार यांनी पुर्वीच आपल्या युवक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची उचलबांगडी झाल्याचा आरोप करणे हास्यास्पद आहे, असे स्पष्टीकरण मनसेचे माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक व निलेश देसाई यांनी दिली आहे. मनसेची वाट लागलेली वाट आम्ही पाहू शकत नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला तरी ही आम्ही यापुढे सुभेदार यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत आमच्या सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढची भूमिका ठरवू, असे ही त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.
विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभेदार यांची उचलबांगडी केल्याचा दावा नवीन गटाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही १३ डिसेंबरला आमच्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु वरिष्ठांच्या सूचनेनुसार याबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती तसेच प्रसार माध्यमांना यावरची माहिती दिली होती, असे त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे तर सद्यस्थितीत जिल्हास्तरावर नेमण्यात आलेले पदाधिकारी अकार्यक्षम असल्यामुळे आणि सतत गल्लीतील तक्रारी होत असल्यामुळे राजकारण आणि विरोध होत असल्यामुळे आपण हा निर्णय घेतला, असे त्यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − four =