You are currently viewing कणकवली हरकुळ बुद्रुक जि.प. मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
Oplus_16908288

कणकवली हरकुळ बुद्रुक जि.प. मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

रावऱाणे–सावंत यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली :

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे जिल्हा परिषद उमेदवार मनोज तुळशीदास रावऱाणे व पंचायत समितीचे उमेदवार चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ हरकुळ खुर्द येथील श्री विठ्ठल मंदिरात करण्यात आला.

हरकुळ खुर्द परिसरात या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा घराघरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मतदारांनी भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केल्याचे मनोज रावऱाणे यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी मनोज रावऱाणे व बबलू सावंत यांच्यासह हरकुळ खुर्द सरपंच श्री. राजन रासम, उपसरपंच सर्वेश दळवी, माजी सरपंच सुभाष दळवी, निलंबर रासम, दाजी रासम, शक्तिकेंद्र प्रमुख राजेंद्र डीचवलकर, बूथ अध्यक्ष श्यामसुंदर रासम, आशुतोष रासम, जयप्रकाश हुले, सोसायटी चेअरमन अण्णा रासम, अविनाश रासम, ग्रामपंचायत सदस्य महेश दळवी, पांडुरंग रासम, गीतांजली रासम, दीपक रासम तसेच भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा