*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आई दैवत*
पण हृदयातील आईच्या आठवणी
कोणाला दाखविता येत नाहीत.
आई म्हणजे काय असते,
तिच्या त्याला कसलेच मोल
नसते, वात्सल्याचा अविरत
अखंड वाहणारा झरा म्हणजे आमची आई, आई माऊली, आई साऊली,आई प्रेमाची पाखर,आई
मायेची झालर, आई कोवळे ऊन
आई थंडीतही ऊब, आई कौतुकाचा पाऊस, आई ममतेची छत्री, आई मनातली मैत्री आई
आपुल्या विश्वाची ़धरित्री,
उगाच नाही म्हणत!
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी।
आईच्या हृदयाचा पाझर,
त्याला ममतेची झालर,
त्याला वात्सल्याची धार,
मायेने ओथंबलेला पदर
जीव होई कासावीस,
न सांगता येत कुणास,
वेदना मनीच्या,
लोकांना वाटे खोटा आभास
पीळ पडे ज्याच्या आतड्या,
त्यास समजे प्रयास
जीव होई कासावीस,
देहरूपी तू नाहीस आता तरी
सदैव आहे तुझा वास अंतरी
नाही फोटो तून तो दिसणार
नाही कुणा कधी कळणार,
तुझे नि माझे मायलेकी नाते
शाश्वत असणार, नाही कुणा दावा याचे, अंतरातच ते जपायचे
आपुल्या मुलांवर माया करीत
असते ते ऋण निभावायचे
अंतःपार याचा ना कळणार
कधीच कोणाते।
हेच आहे शाश्वत।
