You are currently viewing गुलाबी थंडी

गुलाबी थंडी

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी दीपक पटेकर यांची काव्यरचना

पहाटेची गुलाबी थंडी,
त्यात चाहूल तुझी
तू माझ्या जवळी यावं
अनाहूत ही ओढ माझी

तुझं माझ्या जवळ येणं
विलक्षण नजरेने पाहणं
माझ्या हाती हात देत
माझ्या बाहूत विसावणं

गवतावरील दवबिंदू पायांच्या
नाजूक स्पर्शाने तुडवणं
त्या गारगार स्पर्शाने
सर्वांगावर शहारे येणं

तुझं डोकं अलगद तू
माझ्या खांद्यावर टेकवणं
तुला बाहूत घेऊन
पहाटेची सैर करणं

आपल्याच विश्वात तुझं
मनसोक्त ते डुंबणं
तेवढ्यात अंगावर कोवळ्या
सोनेरी किरणांचं पडणं

नकळत पहाटे जगलेल्या
स्वप्नातून जागं होणं
सर्वकाही विलक्षण असं
या गुलाबी थंडीत पहाणं..!!!

©(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 9 =