You are currently viewing आंब्याचे मेगा फूड पार्क गोव्यात तर काजू बोर्ड कोल्हापूरमध्ये व्हावे अशी मागणी..

आंब्याचे मेगा फूड पार्क गोव्यात तर काजू बोर्ड कोल्हापूरमध्ये व्हावे अशी मागणी..

कोकणात काय होणार ? सकल मराठा समाज समन्वयक अँड. सुहास सावंत यांचा सवाल

सावंतवाडी प्रतिनिधी
मेगा फूड पार्क गोव्यात तर काजू बोर्ड कोल्हापूर मध्ये व्हावे अशी मागणी केली जात आहे,मग कोकणात काय होणार आहे असा प्रश्र्न सिंधुदुर्ग सकल मराठा समाज समन्वयक अँड सुहास सावंत यांनी उपस्थित केला आहे.आंबा व काजू पीक कोकणचे असूनही कोकण उपरेच राहिले आहे असे ते म्हणाले

गोवा आणि कोल्हापूर येथील जागृत लोकप्रतिनिधी यांनी हा डाव साधण्यासाठी संस्थांना हाताशी धरून पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री आदींना निवेदन देऊन मागणी केली आहे.मात्र कोकणातून ती झाली नाही असा अंदाज अँड सुहास सावंत यांनी व्यक्त केला

गावात जागृती करा असे आवाहन करताना अँड सुहास सावंत म्हणाले,आंब्याचे मेगा फूड पार्क गोव्यात तर काजू बोर्ड कोल्हापुरात
आणि कोकणाला काय तर बाबाजीचा ठुल्लू?
प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव पास करा, हा कोकणच्या अस्मितेचा प्रश्न आहे,कोकणातील कोणत्याही जिल्ह्यात करा पण कोकणातील प्रमुख पिकांपैकी एक असलेले काजू बोर्ड हे कोकणातच झाले पाहिजे.
आंबा व काजू पीक कोकणचे असूनही कोकण दुर्लक्षित होत आहे.कोकणच्या शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी किमान काजू बोर्ड
कोकणात करावे अशी मागणी अँड सावंत यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू पीक क्षेत्र वाढले आहे.आता शेतकऱ्यांना काजू पीक उत्पादन देणारे असल्याचे पटल्यावर गेल्या काही वर्षांत काजू शेती खालील क्षेत्रात वाढ झाली आहे त्यामुळे केंद्र सरकारने कोकणात आंबा व काजू
बोर्ड निर्माण करावे अशी मागणी केली जात आहे असे ते म्हणाले.
राज्य सरकारने सात वर्षांपूर्वी आंबा व काजू
बोर्ड स्थापनेसाठी पुढाकार घेऊन शंभर कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली होती. त्यानंतर काँग्रेस आघाडी सरकार सत्तेवर आले नाही पण सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना महायुतीचे सरकार आहे त्यामुळे आंबा, काजू व फळपीकाना न्याय मिळावा अशी मागणी अँड सावंत यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 14 =