You are currently viewing स्वराज्य अकॅडमीच्या मुलींची चमकदार कामगिरी

स्वराज्य अकॅडमीच्या मुलींची चमकदार कामगिरी

स्वराज्य अकॅडमीच्या मुलींची चमकदार कामगिरी, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…

​​सावंतवाडी

येथील स्वराज्य फिजिकल अकॅडमीच्या दोन खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सब-ज्युनिअर निवड चाचणी स्पर्धेत या मुलींनी सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई करत हे यश संपादन केले.

​या स्पर्धेत कुमारी आस्था अमित लिंगवत हिने ३०० मीटर धावणे आणि रिले शर्यत अशा दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवले. तसेच कुमारी सौम्या दत्ताराम मेस्त्री हिने गोळाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणि रिले शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवत आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. या दोघींचीही आता राज्यस्तरीय सब-ज्युनिअर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल स्वराज्य फिजिकल अकॅडमीचे संचालक श्री. हर्ष जाधव विनोद चव्हाण, संतोष पाथरवड, आर. ए. सावंत, रवींद्रनाथ गोसावी, अमित लिंगवत आणि वेदिका चव्हाण यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केवले आहे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा