You are currently viewing पंचायत समितीच्या मासिक बैठकीत गदारोळ…

पंचायत समितीच्या मासिक बैठकीत गदारोळ…

महिला डॉक्टरला अपमानास्पद वागणूकीवरून सदस्य आक्रमक;अंतर्गत वाद व डॉक्टरच्या हट्टापायी प्रकार झाल्याचा बाबू सावंत यांचा आरोप

सावंतवाडी

निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा देण्यासाठी आलेल्या स्थानिक एमबीबीएस महिला डॉक्टरला अपमानास्पद वागणूक देऊन तिची हकालपट्टी करण्यावरून सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत एकच गदारोळ उडाला. यावेळी सर्व सदस्य चांगलेच आक्रमक झाले. आरोग्य खात्यातील काही अंतर्गत वाद तसेच डॉक्टरच्या हट्टापायी हा प्रकार झाल्याचा आरोप सभागृहात सदस्य बाबू सावंत यांनी करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासाहित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक सभापती मानसी धुरी.यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. सभेत वरील मुद्द्यावरून सर्व सदस्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड यांना चांगलेच धारेवर धरले. ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टरची आवश्यकता असताना झालेला प्रकार हा निंदनीय असल्याची भावना यावेळी सर्व सदस्यांनी व्यक्त करीत पुराव्यानिशी हा सर्व प्रकार लवकरच उघड करणार असल्याचे सांगितले. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली. दरम्यान सर्वच सदस्यांच्या मागणीवरून येत्या आठ दिवसात या प्रश्नी विशेष सभा बोलावून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन सभापती मानसी धुरी यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + four =