*”जीवनदान महाकुंभ” २०२६ रक्तदान शिबिर आयोजित…*
कुडाळ
साळगाव महाविद्यालयात जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने, मकर संक्रांती आणि भूगोल दिनाचे अवचित साधून ” जीवनदान महाकुंभ ” २०२६ रक्तदान शिबिर या कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आले. सकाळी ०९:०० ते १२:०० या वेळेत महाविद्यालयातील एन.एस.एस. विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगाव चे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री.मुकुंद धुरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर, मुख्यपीठ नाणिजधाम चे प्रमुख सहाय्यक श्री.दीपक खरूडे, संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री.चारुहास सावंत, जिल्हा ब्लड बँक समन्वयक रणजीत जाधव, एस एस पी एम चे सहकारी मनीष यादव, तसेच साळगाव बी.एड महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. गाड, प्रा.सरमळकर महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक खरडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन धनंजय चोपडेकर यांनी केले. रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह अनेक भक्तगणांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमाने सामाजिक बांधिलकी व रक्तदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण केली.
रक्तदान हा एक अनमोल दान आहे, आणि या कार्यक्रमामुळे अनेक जीवनांचे रक्षण होईल अशी आशा व्यक्त केली गेली.
#जीवनदानमहाकुंभ #रक्तदान #मकरसंक्रांती #भूगोलदिन #एनएसएस #साळगावमहाविद्यालय #स्वामीनरेन्द्राचार्य
