You are currently viewing सागरतीर्थ येथील जि. प. स्वनिधीतून मंजूर रस्त्याचे भूमिपूजन…..

सागरतीर्थ येथील जि. प. स्वनिधीतून मंजूर रस्त्याचे भूमिपूजन…..

वेंगुर्ला

तालुक्यातील सागरतीर्थ येथे जिल्हा परिषद स्व निधीतून मंजूर झालेल्या पालयेकर घर ते रामजीवाडी रस्ता खडीकरण- डांबरीकरण करणे या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद माजी आरोग्य शिक्षण सभापती तथा विद्यमान सदस्य प्रितेश राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सागरतीर्थ सरपंच एकनाथ कुडव, उपसरपंच सुषमा गोडकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, सामाजिक कार्यकर्ते बाबु फटनाईक, ग्रा प सदस्य समृद्धी कुडव, गायत्री गोडकर, स्मिता फर्नांडिस, पांडुरंग फोडनाईक तसेच सुखदा पालयेकर, रवी वराडकर, विनायक फटनाईक, पंकज बागकर, महादेव नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा