You are currently viewing शासकीय स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन वर्ग…….

शासकीय स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन वर्ग…….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्याच्या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेबाबत असलेली विद्यार्थी व पालकांची उदासीनता झटकून टाकण्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सत्यवान रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी सीमाशुल्क विभाग भारत सरकार मुंबई यांनी तिमिरातून तेजाकडे या लोक चळवळीतून आशेचा किरण दाखविला आहे. या संधीचा सिंधुदुर्गातील स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी पुढील नियोजित तारखांना संबंधित तालुका नियोजनानुसार मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा.

फेब्रुवारी 2021 मध्ये स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन वर्ग सिंधुदुर्ग नियोजित वेळापत्रक -सावंतवाडी 20 फेब्रुवारी, दोडामार्ग 21 फेब्रुवारी, वेंगुर्ले 23 फेब्रुवारी, कुडाळ 24 फेब्रुवारी, मालवण 25 फेब्रुवारी, देवगड 26 फेब्रुवारी, कणकवली 27 फेब्रुवारी, वैभववाडी 28 फेब्रुवारी याप्रमाणे नियोजित तालुकावार स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन वर्ग होणार आहे. कणकवली तालुक्यातील 27 फेब्रुवारी 20 21 शनिवार रोजी पुढील प्रमाणे ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. कळसुली हायस्कूल सकाळी 8. ०० वाजता, समन्वयक – वगरे सर मुख्याध्यापक कळसुली हायस्कूल, करंजे हायस्कूल वेळ सकाळी 10:30 वाजता, समन्वयक -चोडणकर सर मुख्याध्यापक करंजे हायस्कूल, तर दुपारी 3.OOवाजता , वामनराव महाडिक महाविद्यालय तळेरे – समन्वयक – नलगे सर मुख्याध्यापक तळेरे हायस्कूल, दिलीप तळेकर समाजसेवक तथा माजी सभापती पंचायत समिती कणकवली, तसेच कणकवली तालुक्यातील कळसुली हायस्कूल साठी सुदेश वारंग, सावळे सर, करंजे हायस्कूलसाठी मंगेश आरेकर, सतीश तवटे, वामनराव महाडिक विद्यालय तळेरे हायस्कूल साठी वाळके सर मुख्याध्यापक हायस्कूल वारगाव हायस्कूल, दशरथ शिंगारे मुख्याध्यापक केंद्र शाळा शेर्पे, श्रीराम विभुते उपशिक्षक तळेरे नंबर १, वरील सर्वांशी सदर ठिकाणांसाठी संपर्क साधावा.

त्यासाठी फोन नंबर कळसुली हायस्कूल 94 20 37 83 54 करंजे हायस्कूल 94 23300 507, तळेरे हायस्कूल नलगे सर 9730581484; शिंगारे सर 9421266810 ; वाळके सर;9423300660; विभुते सर 9405734311 यांचेशी संपर्क करावा. तसेच वैभववाडी तालुक्यातील 28 फेब्रुवारी 2021, रविवार रोजी पुढील प्रमाणे ठिकाणी निश्चित केलेली आहेत. सकाळी 10. OO वाजता आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी, समन्वयक – डॉ. काकडे, प्राचार्य आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी संपर्क क्रमांक 98 50 96 00 26, डॉ. अजित दिघे स्पर्धा विभाग प्रमुख आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, संपर्क – क्रमांक 80 87 55 54 65, दशरथ शिंगारे प्राथमिक शिक्षक 94 21 266 810 यांच्याशी संपर्क साधावा.

तर वैभववाडी तालुक्यातील दुसरे ठिकाण यशवंतराव चव्हाण विद्यालय आचिर्णे येथे असून , वेळ दुपारी 3. OOवाजता आहे. या ठिकाणी समन्वयक म्हणून अशोक ठोंबरे मुख्याध्यापक आचिर्णे हायस्कूल संपर्क क्रमांक -70 38 89 34 39, प्रसाद फोंडके मुख्याध्यापक ज्युनियर कॉलेज आचिर्णे, 94207268 82 दशरथ शिंगारे प्राथमिक शिक्षक 94 21 266 810 , सुशील रावराणे समाजसेवक 77 98 95 90 49, वासुदेव रावराणे 94 20 20 64 49 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन तिमिरातून तेजाकडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चळवळीचे प्रणेते सत्यवान रेडकर वतीने करण्यात येत आहे .तसेच विद्यार्थ्यांना सदर मार्गदर्शन वर्गात उपस्थित राहायचे असेल त्यांनी व्हाट्सअप संपर्क क्रमांक 99 69 65 78 20 या व्हाट्सअप नंबर वर आपले नाव व तालुका टाकून संदेश पाठवावा .त्यावर लिंक उपलब्ध करून दिली जाईल .लिंक भरून रूपा रजिस्ट्रेशन करून घ्यावे. कारण एका सेंटरवर किती विद्यार्थी उपस्थित राहतील तसेच पूर्वनियोजन संबंधित ठिकाणी करण्यासाठी सर्व उपस्थित राहणारे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व पालकांनी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन सत्यवान रेडकर तिमिरातून तेजाकडे या चळवळीचे प्रणेते व कनिष्ठ अधिकारी सीमाशुल्क विभाग भारत सरकार मुंबई यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 1 =