पुणे :
झाड ज्याप्रमाणे फुलं आणि सावली देताना फरक करत नाही दरोडेखोर किंवा सज्जन असो, कोणी छोटा किंवा मोठा असो, प्राणी असो किंवा पक्षी सर्वांना झाड प्रेम देते. षडरिपूंवरती मात करते ते म्हणजे झाड तोच आदर्श घेऊन आपण सगळ्या विश्वावरती प्रेम करावं. असे अध्यक्षीय मनोगतात घाणेकर यांनी विचार व्यक्त केले.
साहित्य सम्राट पुणे संस्थेने २१४ वे कवी संमेलन झाडांच्या कविता या विषयावर भारतीय विकास साधना सदाशिव पेठ पुणे येथे आयोजित केले होते. मंचावरती तितिक्षा पुणेच्या संस्थापिका प्रमुख पाहुण्या प्रिया दामले, २१४वे अध्यक्ष मधुसूदन घाणेकर, संस्थापक विनोद अष्टुळ आणि कविराज विजय सातपुते उपस्थित होते. त्यावेळी ते पुढे म्हणाले की दोनशे चौदा कवी संमेलने सातत्याने घेणे सोपे नाही म्हणून आपण आपल्याच माणसाचे कौतुक, सदभावनेने सन्मान करतो हे फार महत्त्वाचे आहे. तसेच कशा पद्धतीने करतो त्या पाठीमागची भावना आपण लक्षात घ्या. मी आपणा सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी उभे राहून जोरदार टाळ्यांच्या गजरात साहित्य सम्राटचा सर्वेसर्वा विनोद अष्टुळ यांचे अभिनंदन करूया.
कवी संमेलनाची सुरुवात संविधान उद्देशिकेच्या वाचनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विनोद अष्टुळ यांनी वास्तविक प्रसंगाचे भान ठेवून माणुसकी आणि साहित्य सेवा घडवणारे विविध उपक्रम कसे तयार झाले. याची माहिती सांगून आजच्या वनराई जाळल्याच्या निषेधार्थ वृक्षांच्या कविता हा विषय साहित्यिकांपुढे सादरीकरणासाठी दिला. याप्रसंगी विश्वविक्रमी डहाळी या अनियत कालिकेच्या १०१८ व्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच साहित्य सम्राट सन्मान पुरस्कार २०२६ हा पुरस्कार डॉ. मधुसूदन घाणेकर यांना साहित्यसम्राट संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आला.
या कवीसंमेलनामध्ये झाडांमधली माणुसकी आणि माणसामधले झाड यांची सुरेख अनुभूती देणाऱ्या दर्जेदार कविता सादर करणारे आदरणीय सर्व कविजन डॉ. मधुसूदन घाणेकर, प्रिया दामले, विनोद अष्टुळ, बाबा ठाकूर, श्रीकांत वाघ, नीला चित्रे, अँड. राजेंद्र पाचुणकर, इंदिरा पूनावाला, शिवाजी उराडे, नकुसाबाई लोखंडे, गणपत तरंगे, संजय माने, ॲड.संध्या देशपांडे, ॲड.संध्या गोळे, सारिका सासवडे, किशोर टिळेकर, नंदकिशोर गावडे, डॉ.आनंद महाजन, सूर्यकांत नामुगडे, विजय सातपुते, आणि इतर अनेक कवी कवयित्रींनी आपल्या वृक्षांच्या कविता सादर करून शब्दांची वनराई फुलवली. अशा या बहारदार कवी संमेलनास रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कवी संमेलनाचे सूत्रसंचालन विजय सातपुते यांनी तर आभार शिवाजी उराडे यांनी उत्कृष्टरित्या मानले.
