You are currently viewing वेंगुर्लेत पोलीस दलातर्फे ” रेझिंग डे ” सप्ताहा निमीत्त कॅम्प मैदानावर खुल्या मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्लेत पोलीस दलातर्फे ” रेझिंग डे ” सप्ताहा निमीत्त कॅम्प मैदानावर खुल्या मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन

*वेंगुर्लेत पोलीस दलातर्फे ” रेझिंग डे ” सप्ताहा निमीत्त कॅम्प मैदानावर खुल्या मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन*

*सामाजिक कार्यकर्ते प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते बक्षिस वितरण संपन्न*

वेंगुर्ले

*पोलीस रेझिंग डे सप्ताह* निमित्त दिनांक 02/01/ 2026 ते दिनांक 08/01/ 2026 मुदतीत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . सदरच्या पार्श्वभूमीवर दिनांक 04/ 01/2026 रोजी वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे माननीय पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व माननीय अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री निसर्ग ओतारी यांनी वेंगुर्ला कॅम्प येथे खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती.
सदर स्पर्धेकरिता सर्व वयोगटातील विद्यार्थी , नागरिक सामाजिक कार्यकर्ते , शासकीय कार्यालय कर्मचारी , पोलीस पाटील , होमगार्ड , खेळाडू , तसेच शाळा महाविद्यालय यांना सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आवाहन करण्यात आलेले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील जवळ जवळ १०० जण सहभागी झाले होते .
यावेळी निसर्ग ओतारी पोलीस निरीक्षक वेंगुर्ला पोलीस ठाणे , सामाजिक कार्यकर्ते प्रसंन्ना देसाई , कांबळे पोलीस उपनिरीक्षक वेंगुर्ला पोलीस ठाणे , बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.जयसिंग नाईक सर , प्रा.कमलेश कांबळे , प्रा.वासुदेव गावडे , प्रा.सौ.शिवकन्या तोडकर हे प्रमुख उपस्थित होते .
यावेळी खालील स्पर्धकांनी क्रमांक मिळवीले .
*पुरुष गट*
प्रथम क्रमांक – शंकर परब
द्वितीय क्रमांक – प्रशांत खोत होमगार्ड
तृतीय क्रमांक – तेजस देसाई .होमगार्ड

*महिला गट*
प्रथम क्रमांक – तेजस्वी धुरी होमगार्ड .
द्वितीय क्रमांक – मृणाली नेरुरकर होमगार्ड .
तृतीय क्रमांक – शिवन्या चिचकर पोलीस पाटील.

प्रतिक्रिया व्यक्त करा