You are currently viewing फडणवीस पुन्हा सीएम होण्यासाठी विठ्ठलाचरणी भाजपचा ‘महायज्ञ’!

फडणवीस पुन्हा सीएम होण्यासाठी विठ्ठलाचरणी भाजपचा ‘महायज्ञ’!

सावंतवाडी

महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्ष नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांचा मार्ग सुकर व्हावा यासाठी पांडुरंगाचा आशीर्वाद मिळावा म्हणून सावंतवाडी शहरातील विठ्ठल मंदिर येथे भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग च्या वतीने पुरोहितांच्या उपस्थितीत व मंत्रोच्याराच्या गजरात यज्ञाचा धार्मिक कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, संध्या तेरसे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, बंड्या सावंत, जिल्हा चिटणीस, शहराध्यक्ष अजय गोंदावले, शेखर गावकर, शर्वाणी गावकर, रविंद्र मडगावकर, शीतल राऊळ, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, आनंद नेवगी, बंटी पुरोहित, मोहिनी मडगांवकर, परीक्षित मांजरेकर, मिसबा शेख आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा