You are currently viewing सिलिका वाळूचा अनधिकृत उपसा..

सिलिका वाळूचा अनधिकृत उपसा..

पियाळी नदीपात्रात वाळूमिश्रित दूषित पाणी..

कणकवली :

कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे शासनाची रॉयल्टी चुकवून नियमबाह्य सिलिका वाळू उत्खनन होत आहे. क्षमतेपेक्षा ज्यादा टन सिलिका वाळू वाहतूक होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. दरम्यान नदीपात्रात वाळू मिश्रित पाणी सोडले जात असल्याने ग्रामस्थ संतप्त बनले आहेत.

दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्यास सोबतच नळयोजनेचे पंप बंद होत आहेत. विहिरीमध्ये गाळ साचत आहे. वाघेरी पासून ते नांदगाव, तोंडवली, असलदे, कोळोशी ते हाडपिड, ओंबळपर्यंतच्या भागात पाणी दूषित झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =