You are currently viewing मालवणात 22 रोजी रोटरीतर्फे “होप एक्सप्रेस”..

मालवणात 22 रोजी रोटरीतर्फे “होप एक्सप्रेस”..

मालवण :

२२ मार्च रोजी “होप एक्सप्रेस” मालवणात येणार आहे. रोटरी क्लब मालवण तर्फे २२ ते ६५ वयोगटातील लोकांची मुखाचे कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशय कॅन्सरचे निदान करण्यासाठी ही एक्स्प्रेस येणार आहे. लिमये हॉस्पिटल मध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत ही तपासणी चालणार आहे. यात फक्त पूर्वनोंदणी झाले ५० पेशंट्स तपासण्यात येणार आहे. मॅमोग्राफी पॅप स्मिअर व तोंडातील कॅन्सरसाठी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व निदान केले जाणार आहे. यात संशयित रुग्णांच्या पुढील तपासण्या व उपचार कोल्हापूर कॅन्सर सेंटर मार्फत करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =