वैभववाडी तालुक्यात तालुकास्तरीय बाल कला, क्रीडा व ‘ज्ञानी मी होणार’ महोत्सवाचे भव्य उद्घाटन
वैभववाडी
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवी जिल्हा परिषद शाळा येथे तालुकास्तरीय बाल कला, क्रीडा व ‘ज्ञानी मी होणार’ या महोत्सवाचे उद्घाटन माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी पालकमंत्री नितेशजी राणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी श्री. प्रीमेश वाघ, माजी सभापती श्री. भालचंद्र साठे, श्री. शिपाद मांजरेकर, श्री. बाळा जठार, भाजप तालुका अध्यक्ष श्री. सुधीर नकाशे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री. तुळशीदास रावराणे, नाधवडे सरपंच श्रीमती लीना पांचाळ, भाजप पदाधिकारी सौ. प्राची तावडे, श्री. दिगंबर पाटील, श्री. हुसेन लांजेकर, वैभववाडी नगराध्यक्ष सौ. श्रद्धा रावराणे, श्री. बाबा कोकाटे, श्री. बंड्या मांजरेकर, श्री. मंगेश लोके, श्री. संजय चव्हाण, श्री. बंटी रावराणे, गटशिक्षण अधिकारी श्री. अशोक वडर तसेच भाजपचे पदाधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला व क्रीडा प्रकारांना उपस्थित मान्यवरांनी दाद दिली. हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व क्रीडाक्षमतेला व्यासपीठ देणारा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
