You are currently viewing वेंगुर्लेत स्वरयोग निर्मित ‘स्वर वसंत’ कार्यक्रम

वेंगुर्लेत स्वरयोग निर्मित ‘स्वर वसंत’ कार्यक्रम

वेंगुर्लेत स्वरयोग निर्मित ‘स्वर वसंत’ कार्यक्रम

न. प. च्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष व संगीतकार वसंत देसाई यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन

वेंगुर्ले :

वेंगुर्ला नगरपरिषदेचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि संगीतकार वसंत देसाई यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त स्वरयोग निर्मित “स्वर वसंत” हा सुमधुर गीतांचा बहारदार कार्यक्रम, २८ डिसेंबर रोजी सायकाळी ६.३० वाजता मधुसूदन कालेलकर बहुडेशीय सभागृह वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.

या कार्यक्रमाचे निर्माते व निवेदक प्रदीप देसाई असून, वसंत देसाई यांच्या अजरामर संगीत रचनांना अभिवादन करण्यासाठी नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात केतकी भावे (‘सारेगम फेम), नीलेश निरगुडकर, डॉ तेजस्विनी देसाई व आत्माराम गोसावी हे कलाकार गाणी सादर करणार आहेत. प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री फैयाज शेख उपस्थित राहणार असून, सुराज साठे यांचे संगीत संयोजन कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहे.

हे वर्ष वेंगुर्ला नगरपरिषदेचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्याचबरोबर कोकणचे सुपुत्र व प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांचा पन्नासाव्या स्मृतिदिन सुद्धा आहे याचे अवचित्त साधून निर्माते व निवेदक प्रदीप देसाई यांच्या संकल्पनेतून सदर होणाऱ्या या संगीतमय पर्वणीचा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा