You are currently viewing मळेवाड-कोंडुरे येथे महिला दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

मळेवाड-कोंडुरे येथे महिला दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी :

मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिनानिमित्त उद्या येथील सुदर्शन सभागृहत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तरी या उपक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यात दुपारी दुपारी १:०० ते २:०० या वेळेत पाककला स्पर्धा, २:०० ते ३:०० हळदी कुंकू, या नंतर खेळ पैठणी व त्यानंतर संगीत खुर्ची, लिंबू चमचा व विविध फनी गेमचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा व स्पर्धांचा गावातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत कडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा