You are currently viewing सावंतवाडीतील पत्रकारांकडून नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा !

सावंतवाडीतील पत्रकारांकडून नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा !

शहराच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्याची दिली ग्वाही

सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी शहराच्या विकासासाठी पत्रकार या नात्याने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही सावंतवाडीतील पत्रकारांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोंसले यांना दिली.

श्रद्धा भोंसले यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर सावंतवाडीतील पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नगरपरिषदेच्या पत्रकार कक्षाचे नूतनीकरण करावे तसेच वातानुकूलित यंत्रणा बसवावी, अशी मागणी यावेळी पत्रकारांनी केली.

यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सह सचिव विनायक गांवस, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष अमोल टेंबकर, माजी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, पत्रकार रुपेश हिराप, राजेश नाईक, नरेंद्र देशपांडे, नागेश पाटील, डिजिटल मीडियाचे पत्रकार आनंद धोंड, शैलेश मयेकर, जय भोंसले, निखील माळकर, भुवन नाईक, विनय वाडकर त्यांच्यासह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा