You are currently viewing सावंतवाडी नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा भोसले यांचा 745 मतांनी दणदणीत विजय

सावंतवाडी नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा भोसले यांचा 745 मतांनी दणदणीत विजय

सावंतवाडी नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा भोसले यांचा 745 मतांनी दणदणीत विजय

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार श्रद्धा भोसले यांनी 745 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या नीता कवीटकर, ठाकरे शिवसेनेच्या सीमा मठकर तसेच काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांना पराभव स्वीकारावा लागला.
मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासूनच श्रद्धा भोसले आघाडीवर होत्या. अखेरच्या फेरीत त्यांची आघाडी कायम राहिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या विजयामुळे सावंतवाडी नगरपालिकेत भाजपचे राजकीय वजन अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा