You are currently viewing शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा माणगाव मधून शुभारंभ

शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा माणगाव मधून शुभारंभ

आमदार वैभव नाईक, संग्राम प्रभुगावकर यांनी केले मार्गदर्शन

माणगाव खोरे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील जनता शिवसेनेच्या पाठीशी ठाम आहे. सर्व शिवसैनिकांनी एक दिलाने एक विचारांनी काम करून प्रत्येक घराघरात शिवसेना सदस्य बनवा.शिवसेना आपल्या दारी हा कानमंत्र घेऊन जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त “सदस्य नोंदणी”करून सिंधुदुर्ग जिल्हा पूर्णतः भगवामय करण्याचे उद्दिष्ट धरून शिवसैनिकांनी काम करावे.असे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव यांनी केले आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते १५ डिसेंबर या कालावधीत शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा आज माणगाव मधून शुभारंभ करण्यात आला. कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रथम माणगाव गावची ग्रामदेवता श्री.यक्षिणी देवी,व प.पू.टेंबेस्वामी महाराज यांचे दर्शन घेऊन माणगावमधील राधाकृष्ण हाॅल मध्ये “सदस्य नोंदणी अभियान”कार्यक्रम पार पडला.


यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, कुडाळ तालुक्याबरोबरच माणगाव खोऱ्यातील प्रत्येक गावात विकास काम पोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला आहे. माणगाव हा दोन तलाठी कार्यालय व १ महसूल मंडळ असलेला एकमेव गाव आहे. तसेच येथील प्रत्येक उपकेंद्रात बी. ए. एम. एस डॉकटर उपलब्ध करण्यात आले आहेत. जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली असून सिंधुदुर्ग वासियांची स्वप्नपूर्ती ठाकरे सरकार माध्यमातून होत आहे. तसेच या पुढील काळात जास्तीत जास्त निधी जिल्हयात आणण्याचा आपला प्रयत्न आहे असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले
कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर म्हणाले, मागील पंचवीस वर्षात जो विकास झाला नाही,प्रलंबित राहिला तो विकास करण्याचे काम आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी मतदारसंघात आणला आहे. अतिशय खडतर परिस्थितीत सिंधुदुर्गात दहशतीचे वातावरण होते त्यावेळी शिवसेना पक्षाची जिल्ह्यात संघटना वाढविली. शिवसेना पक्ष हा संघटनेच्या आधारावर उभा राहिला आहे. त्यामुळे शिवसेना सदस्य नोंदणी हि शिस्तबद्ध पद्धतीने करायची आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे प्राबल्य दाखविण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. असे सांगत सदस्य नोंदणीत कुडाळ मालवण पॅटर्न हा इतर तालुक्यांमध्ये एक नंबरचा असेल तसे काम केले जाणार असल्याचे संग्राम प्रभुगावकर यांनी आश्वसित केले.
. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमसेन सावंत, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जि.प.सदस्य राजू कविटकर, तालुका प्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे,उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर,पंचायत समिती सदस्य सौ.श्रेया परब,,सौ.मथुरा राऊळ,महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, युवासेना तालुकाप्रमुख राजू जांभेकर, योगेश धुरी, आदिसह माणगाव पंचक्रोशीतील शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे घावनळे जि.प मतदारसंघाचा गोठोस येथे सदस्य नोंदणी कार्यक्रम पार पडला यावेळी विभागप्रमुख रामभाऊ धुरी, उपविभाग प्रमुख प्रशांत म्हाडगुत,सागर म्हाडगुत,उत्तम म्हाडगुत,सुधीर राऊळ,सुरेश मेस्त्री, भाऊ सावंत,विष्णू ताम्हणेकर,दाजी पडकील आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा