नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अकरावीचे ऑनलाईन वर्ग…

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अकरावीचे ऑनलाईन वर्ग…

मुंबई 

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये, म्हणून येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरु केले जाणार आहेत.

मराठा आरक्षणाचा निर्णय आणखी 4 आठवडे लांबणीवर पडल्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार?, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार? याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात होतं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला दिलासा मिळावा आणि विद्यार्थ्यांना हव्या त्या शाखेचा अभ्यासक सुरु करता यावा यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमाद्वारे शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिलीये.

या माध्यमातून विशेषत: विज्ञान, वाणिज्य, कला या शाखांमधील सर्वाधिक घेण्यात येणारे विषय किंवा बंधनकारक असलेल्या विषयांच्या तासिका उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

तसंच ऑनलाईन तासिका कोणत्या व्यासपिठावर, कशा आणि किती वेळासाठी उपलब्ध होतील यासंदर्भातील माहिती लवकरच देण्यात येणार आहे, असही शिक्षण विभागाने स्पष्ट केलंय.

प्रतिक्रिया व्यक्त करा