*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”अदिती देवतांची माता”*
अदिती देवतांची माता करी रक्षण
तिन्ही लोकी संचार दुःख करी हरणIIधृII
तव कीर्ती अगाध राहे चारही वेदांत
सूक्ते ऋचेत मातेची कीर्ती आहे महान
करी सर्व सृष्टीचे पालन पोषणII1II
अदिती देवीचा महिमा थोर शालिनी ज्ञात
अमर चिरतरुण सुखदाती नितीज्ञ
मृत्यूचे भय दूर करी दोष हरणII2II
देवमाता करी स्वर्ग अंतरिक्ष संचार मुक्त
संसाराची निर्माती आहे माता पिता पुत्र
प्रजेच्या उत्पत्तीचे अदिती देवी कारणII3II
जन्मदा अन्नदा सांभाळी आईच्या मायेनं
महांकाली सरस्वती लक्ष्मी दावी मातृ पण
वेदवती देई सुसंस्कार करू वंदनII4II
©️कवी.श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
