You are currently viewing कणकवलीत आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅप्पीनेस प्रोग्राम उत्साहात सुरू

कणकवलीत आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅप्पीनेस प्रोग्राम उत्साहात सुरू

कणकवलीत आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅप्पीनेस प्रोग्राम उत्साहात सुरू

कणकवली :
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारा तणाव, अस्थिरता व मानसिक असमाधान दूर करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेला हॅप्पीनेस प्रोग्राम कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू आहे. मन शांत ठेवणे, आनंदी व समाधानी जीवन जगणे यासाठी योगासने, श्वासोच्छवासाचे व्यायाम तसेच सुदर्शन क्रियेवर आधारित हा कार्यक्रम लाभदायक ठरत आहे.

कणकवली येथील उत्कर्षा हॉलमध्ये १६ डिसेंबरपासून या हॅप्पीनेस प्रोग्रामला सुरुवात झाली आहे. श्री श्री रविशंकर यांच्या विचारांतून साकार झालेल्या सुदर्शन क्रियेबाबत मार्गदर्शक उमेश वायंगणकर यांच्याकडून सखोल व मौलिक मार्गदर्शन दिले जात आहे. सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रांमध्ये स्त्री व पुरुष मिळून सुमारे ५५ ते ६० जणांचा सहभाग या शिबिरात आहे. समाजातील विविध घटकांतील नागरिकांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

या शिबिरात जगप्रसिद्ध व जीवनाला सकारात्मक वळण देणारी दिव्य सुदर्शन क्रिया शिकवली जात आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, तणाव व अस्वस्थता कमी करणे, सकारात्मकता व उत्साह वाढवणे, मानसिक व भावनिक स्वास्थ्य जपणे तसेच निरोगी, शांत व आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन या कार्यक्रमात दिले जात आहे.

हॅप्पीनेस प्रोग्राममधून सहभागी प्रशिक्षणार्थींना जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळत असून, हा अनुभव एक नवीन जीवनप्रवास ठरत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कणकवलीत आयोजित या हॅप्पीनेस प्रोग्रामला सर्वत्र समाधानकारक आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा