You are currently viewing फोंडाघाट मध्ये सत्यनारायण पूजेसाठी   श्रीरामाचा बनवलेला मखर ठरले आकर्षण

फोंडाघाट मध्ये सत्यनारायण पूजेसाठी श्रीरामाचा बनवलेला मखर ठरले आकर्षण

फोंडाघाट मध्ये सत्यनारायण पूजेसाठी श्रीरामाचा बनवलेला मखर ठरले आकर्षण

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये सालाबाद प्रमाणे बिजलीनगर येथे सत्यनारायण पुजा संपन्न झाली. नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य अमीत चव्हाण हे पुजेला बसले. दुपारी महाप्रसाद असलेने सर्व फोंडाघाट वासीयांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमासाठी सर्व वाडीवासीय परिश्रम घेतात. सर्वांची आत्मियतेने चौकशी करतात. शिस्त प्रिय लाईन लावुन दर्शन आणि महीला पुरुष यांच्या निरनिराळी लाईन असलेने शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद दश दिला जातो. रात्री आॅक्रेस्ट्रा आणि भजन, संगीत खुर्ची असे अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अजित नाडकर्णी यांनी गणेश मंडळाचे कौतुक केले. सत्यनारायण पूजेसाठी श्रीराम पुजेचं मकर एकदम आकर्षण ठरले. श्रीराम पूजेचा मकर पाहण्यासाठी फार गर्दी झाली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा