मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी…
वैभववाडी
नगरपंचायत निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच अनुषंगाने मागे मतदार नोंदणी झाली होती या मतदार नोंदणीवर काही नागरिकांनी हरकत घेतल्यानंतर प्रांताधिकारी यांच्या मार्फत सर्वे करण्यात आला होता.परंतु आता १५ तारीखला नवीन मतदार यादी प्रसिध्द होण्याआधीच वैभववाडी नगरपंचायत मार्फत प्रत्येक प्रभाग निहाय मतदार नोंदणी झाली आहे काय? याची पडाळणी नगरपंचायतीच्या माध्यमातून होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ही नोंदणी पुन्हा बोगस नोंदणी होऊ नये,यासाठी ज्या प्रभागात घर त्याचं प्रभागात त्याची नोंदणी व्हावी.अशी मागणी माजी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाव्दारे केली आहे.
