You are currently viewing तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी ११ व १२ ऑगस्ट रोजी कुडाळ येथे पुन्हा एकदा मोफत मार्गदर्शन शिबीर

तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी ११ व १२ ऑगस्ट रोजी कुडाळ येथे पुन्हा एकदा मोफत मार्गदर्शन शिबीर

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फौडेशन कोल्हापूर यांचे आयोजन*

*आमदार वैभव नाईक यांचा पुढाकार*

तलाठी भरती २०२३ साठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांना तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने तसेच विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फौडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मार्गदर्शन शिबीर जुलै महिन्यात घेण्यात आले होते. या शिबिराला परीक्षार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिरातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन झाल्याने पुन्हा एकदा हे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा आग्रह विद्यार्थ्यांनी केल्याने उद्या शुक्रवार ११ ऑगस्ट व शनिवार १२ ऑगस्ट २०२३ रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सकाळी ९.३० ते ५ या वेळेत हे मार्गदर्शन शिबीर घेण्यात येणार आहे.
अरुण नरके फौडेशन कोल्हापूर ही संस्था स्पर्धा परीक्षा व सामाजिक क्षेत्रातील तब्बल २६ वर्षाचा अनुभव असणारी विश्वनीय संस्था आहे. आजपर्यंत त्यांचे ४६५० विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत कार्यरत आहेत.या संस्थेचे मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व्हावे आणि सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी तलाठी व्हावेत यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवलीच्या माध्यमातून हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पुन्हा होणाऱ्या तलाठी भरती मोफत मार्गदर्शन शिबीराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घावा, अधिक माहितीसाठी श्री. समीर कुंभार मोबा- ९१४२४३४४४८ श्री. तेजस मडवळ मोबा- ८७६७०९५०११ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवलीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 13 =