*साळगाव महाविद्यालयाच्या NSS श्रमसंस्कार शिबिराचे पिंगुळी येथे भव्य उद्घाटन*
पिंगुळी ग्रामपंचायत, कुडाळ
परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने पिंगळी ग्रामपंचायत येथे आयोजित निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन मुंबई विद्यापीठ NSS जिल्हा क्षेत्र समन्वयक (सिंधुदुर्ग) प्रा. वसीम सय्यद यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी संस्था अध्यक्ष श्री. मुकुंद धुरी, संस्था सदस्य श्री. दशरथ राऊळ, पिंगुळी ग्रामपंचायतचे सरपंच श्री. अजय आकेरकर, उपसरपंच श्री. मंगेश मसके, श्री. साई राऊळ, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य प्रा.सचिन पाटकर प्रास्ताविकेत असं म्हणाले अशा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते व महाविद्यालयात अशा विविध कार्यक्रमांमुळे विद्यार्थी एक संघटनणेने काम करतात भविष्यात समाजात वावरताना त्यांना अशा गोष्टीची जाणीव होऊन योग्य ती दिशा मिळण्यास मदत होते तसेच या शिबिरासाठी अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केले त्यांचे धन्यवाद.
🎤 उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रा. वसीम सय्यद यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात श्रमसंस्काराचे महत्त्व अधोरेखित करत योग्य मार्गदर्शन मिळाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी भविष्यात क्लास वन अधिकारी होऊन समाजाला योग्य दिशा देतील, असा विश्वास व्यक्त केला.
👨🏫 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावचे अध्यक्ष श्री. मुकुंद धुरी होते. मोबाईल व इंटरनेटच्या युगात संस्कारांची गरज अधिक भासते असून, अशा शिबिरांमधून विद्यार्थ्यांना जीवनाला योग्य दिशा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
🤝 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
NSS विभागप्रमुख प्रा. भक्ती चव्हाण, सहाय्यक विभागप्रमुख प्रा. अंकिता नवार, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.
📌 प्रास्ताविक – प्रा. भक्ती चव्हाण
🙏 आभार प्रदर्शन – प्रा.पास्ते सर
✨ श्रम, सेवा आणि संस्कार यांची त्रिसूत्री जपणारे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. ✨
