*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सावित्रीबाई*
माझ्या सावित्री मायेनं
अंधश्रध्दा दुर केली
चुल घरातील महिलां
पाटी पेन्सिल हाती दिली
आसू लेकी बाळींचे
पुसले ते पदराने
गेली शाळा शिकवाया
धिक्कारले समाजाने
लिंगभेद न मानता
फोडली वाचा अन्यायाला
भवितव्य घडविले
न डरता समाजाला
डोईवरचा पदर
डोईवरचं जपला
समाजाच्या मर्यादाना
नित्य आनंद मानला
केस विधवेचे कापता
दुखावली ती अंतरी
अरे, आपलीच बहीण
कारे, माणुसकी विसरी
पाण्यासाठी कासावीस
होई दलितांच्या पोरी
दया, माया नाही तुम्हा
काय रे, त्यांनी केली चोरी
दिले मुलींना शिक्षण
उभ्या केल्या पायावरी
अशी माझी सावित्री आई
पोरं शिकली भूवरी
*शीला पाटील. चांदवड*
