You are currently viewing चाफेड येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न

चाफेड येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न

चाफेड येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न

देवगड

महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना अंतर्गत द्वितीय वर्ष गाव पातळीवरील शेतकरी प्रशिक्षण वर्ग चाफेड ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आले.

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक निकेतन राणे यांनी प्रास्ताविक करताना उपस्थित शेतकरी यांना घटस्थारावरील बी आर सी युनिट उभारणी बाबत माहिती दिली. तसेच या वर्षात करावयाच्या इतर बाबी बाबत माहिती दिली . तज्ञ मार्गदर्शक डॉ बी.एम. लांबाडे यांनी पीआरसी उभारणी कशी करावी याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले तसेच काजू पिकावरील कीड रोग व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. चाफेड सरपंच महेश राणे यांनी अध्यक्षीय भाषणात कृषी विभागाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकेतन राणे यांनी केले. या कार्यक्रमाला मोरया शेतकरी गट अध्यक्ष तथा ग्रा. प. सदस्य सुनील कांडर, श्री वक्रतुंड शेतकरी गट अध्यक्ष सचिन मोंडकर, माजी सरपंच आकाश राणे, ग्रा. प. सदस्य सुदर्शन साळकर, पोलीस पाटील संतोष सावंत, संतोष भोगले, प्रकाश भोगले, पंढरीनाथ कांडर, माजी सरपंच संतोष साळसकर, सत्यवान साटम, सत्यवान कांडर तसेच दोन्ही गटातील सर्व सदस्य, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन निकेतन राणे यांनी तर आभार सरपंच महेश राणे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा