*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*क्षण निरागस*
〰️〰️〰️〰️
कां ? कसे कुणी कुणास गमविले
हाच प्रश्न आजही अनुत्तरीत आहे
असे कसे निष्पाप प्रीतभाव विरले
हे आठव सारे जीवास छळते आहे
वास्तवात ना दोष कुणाचाच होता
तरीही आजही अंतरात खंत आहे
विरह सोसता सोसता जगणे सरले
तरी तीच प्रितासक्ती चिरंतनी आहे
दरवळणारा प्राजक्त तो पारावरचा
अंतरास गंधाळूनी घुटमळतो आहे
गोपुरे राऊळीची , गाज सागराची
ऋतुऋतूतुनी जीवा खुणावते आहे
काय काय कसे किती स्मरावे सारे
गगन क्षितिजावरी सांजाळले आहे
वाटते आता भेट व्हावी एकदातरी
व्याकुळ स्पंदनांचीच गुणगुण आहे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️वि.ग. सातपुते ( भावकवी)*
*📞( 9766544908)*

