You are currently viewing ठाकर आदिवासी कलांचा अभिमानशाली गौरव! 

ठाकर आदिवासी कलांचा अभिमानशाली गौरव!

राज्य सांस्कृतिक पुरस्काराने ‘ठाकर आदिवासी कला आंगण’ सन्मानित

ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककलांचा वारसा जपण्यासाठी २००६ पासून कार्यरत असलेल्या ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरीच्या योगदानाची राज्यस्तरीय दखल

 

मुंबई :

ठाकर आदिवासी समाजाच्या समृद्ध कला–संस्कृतीचे संवर्धन व जतन करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल “महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२५” हा मानाचा सन्मान ‘ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी’ला प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. आशिष शेलार, सांस्कृतिक विभागाचे सचिव मा. डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक मा. विभीषण चवरे यांच्या शुभहस्ते रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे ३ डिसेंबर २०२५ रोजी पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांनी स्वीकारला.

या सन्मानामुळे ठाकर आदिवासी समाजाची कला, संस्कृती आणि परंपरा नव्या उंचीवर पोहोचली असून हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य अधिक जोमाने सुरू राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा