माजी सैनिक वसतिगृह आणि विश्रामगृहासाठी कंत्राटी पदभरती
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्गच्या अधिपत्याखाली असलेल्या, सैनिकी मुलांचे वसतीगृह व माजी सैनिक विश्रामगृह सावंतवाडी येथे माजी सैनिक प्रवर्गातुन दोन कंत्राटी अशासकीय पदे तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.
सैनिकी मुलांचे वसतिगृहात, अशासकीय वसतीगृह अधीक्षक हे एका पदासाठी सैन्यातुन सुबेदार या पदावरुन सेवानिवृत्त झालेला असावा तसेच संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. माजी सैनिक विश्रामगृह, सावंतवाडी येथे अशासकीय पहारेकरी या एका पदासाठी सैन्यातुन हवलदार पदापर्यंत सेवानिवृत्त झालेला असावा.
तरी पात्र माजी सैनिकांनी सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्र, 02 फोटो, आधार कार्ड या कागदपत्रांसह दिनांक 10 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी (मानधन व कामाचे स्वरूप) दुरध्वनी क्र- 02362-228820/ 9322051284 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
