‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेअंतर्गत सुमारे ४५० किलो धान्याचे वाटप…

‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेअंतर्गत सुमारे ४५० किलो धान्याचे वाटप…

वेंगुर्ला प्रतिनिधी
वजराट गावच्यावतीने ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेअंतर्गत सुमारे ४५० किलो धान्याचे वाटप सिधुदुर्ग जिल्ह्यातील विविध आश्रमांना करण्यात आले.कोव्हीड- १९च्या महामारीमुळे अनेक वृद्धाश्रम व परप्रांतीय यांची उपासमार झाली होती.

अशा गरजूंना धान्य देण्यासाठी ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेअंतर्गत वजराट गावाच्यावतीने गावातील रेशनिंग कार्ड धारकांना १ किलो धान्य जमा करण्याचे आवाहन श्री गिरेश्वर सोसायटीतर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील ३५० कार्डधारकांनी प्रधानमंत्री मोफत अन्नधान्य योजनेअंतर्गत मिळालेल्या धान्यातील १ किलोप्रमाणे धान्य गोळा केले. गोळा केलेल्या धान्यापैकी १०० किलो धान्य संविता आश्रम पणदूर, १०० किलो धान्य जिव्हाळा सेवाश्रम पिंगुळी, १५० किलो धान्य गावातील गरजू व गरीब व्यक्तींना प्रत्येकी १० किलो प्रमाणे देण्यात आले. तसेच वजराट- देवसूवाडीतर्फे अणाव येथील आनंदाश्रमास १०० किलो धान्य देण्यात आले.

यावेळी श्री देव गिरेश्वर सोसायटीचे अध्यक्ष बाबुराव परब, उपाध्यक्ष वसंत पेडणेकर, संचालक विलास गावडे, सचिव पांडुरंग दळवी, ग्रामसेवक गावडे, रवींद्र पेडणेकर, साईप्रसाद केरकर, बाळकृष्ण सोन्सुरकर, प्रवीण गावडे, रजत पडते आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा