मतदारांचे खरे प्रश्न ओळखतो; एक संधी द्या – समिउल्ला ख्वाजा व फरीदा बागवान
सावंतवाडी :
सत्ताधारी आणि विरोधकांना लोक कंटाळले असून प्रभाग क्र. ९ मधील जनता आपल्याला ठामपणे साथ देईल, असा विश्वास अपक्ष उमेदवार समिउल्ला ख्वाजा आणि परिदा बागवान यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, प्रभागाच्या विकासासाठी आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी घराघरांत भेट देत दिले. निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले असताना दोन्ही उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.
महिलांच्या सक्षमीकरण, रोजगार निर्मिती आणि प्रभागातील मुख्य प्रश्नांवर उपाय देणे हे आपले प्राधान्य असल्याचे दोघांनी सांगितले. “आपण उच्चशिक्षित असल्यामुळे मतदारांचे खरे प्रश्न काय आहेत, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे या वेळी लोकांनी आम्हाला एक संधी द्यावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
