You are currently viewing संदेश राजकारणाच्या पलीकडचा मित्र

संदेश राजकारणाच्या पलीकडचा मित्र

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सामंत, तालुकाध्यक्ष पिळणकर यांच्या शुभेच्छा

कणकवली

संदेश पारकर हे वलयांकित नाव आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा संदेश पारकर हा सच्चा माणूस आहे.अगदी ऐन पंचविशीत कणकवली सरपंच असणारे संदेश पारकर हे राज्याच्या कानाकोपऱ्यात सर्वश्रुत झालेले नाव आहे. त्यांच्या लौकिकाला साजेसा सन्मान राजकीय जीवनात मिळणे आवश्यक आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी पारकर याना शुभेच्छा देताना त्यांच्या राजकीय जीवनातील सर्व महत्वाकांक्षा पूर्ण होवो, पक्ष वेगळे असले तरी आमच्या मैत्रीचे मन एकच असल्याचे सांगत पारकर यांचे अभिष्टचिंतन केले

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + nineteen =