You are currently viewing शिवसेनेचा सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन…

शिवसेनेचा सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन…

विक्रांत सावंत व रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्थानकाबाहेर सेनेचे धरणे आंदोलन

खासदारांचा पुतळा जाळणाऱ्या नगराध्यक्षांसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा…

२४ तासांच्या आत प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी…

सावंतवाडी

खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळणाऱ्या नगराध्यक्षांसह भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे. दरम्यान २४ तासांच्या आत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही, असा इशारा त्यांनी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांना दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =