ग्रामीण रुग्णालयाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात मनसेचे उद्या आंदोलन…

ग्रामीण रुग्णालयाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात मनसेचे उद्या आंदोलन…

वैभववाडी प्रतिनिधी
जिल्हा रुग्णालयासह वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या नियोजनशून्य कारभाराविरोधात मनसेच्या वतीने दि. ७ सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालयासमोर जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. वैभववाडी वासिंयांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथील कोव्हीड केअर सेंटरचा कारभार हा ग्रामीण रुग्णालयाकडे सोपविण्यात आला आहे. मात्र या कक्षाची अवस्था आंदळ दळतंय अनं कुत्र पीठ खातय.. अशी झाली आहे. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. प्रशासनाला जाग आणण्यासाठी मनसेच्यावतीने जन आंदोलन पुकारण्यात आले आहे. तालुक्यातील जनतेने या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सचिन तावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा