You are currently viewing कणकवलीत भाजपला मोठी भरारी; उबाठा सेनेचे कार्यकर्ते कमळाच्या छत्राखाली

कणकवलीत भाजपला मोठी भरारी; उबाठा सेनेचे कार्यकर्ते कमळाच्या छत्राखाली

संदेश सावंत यांच्या पुढाकाराने हरकूळ-बुद्रुक सुतारवाडीतील कार्यकर्त्यांचा ओम गणेश निवासस्थानी सामूहिक पक्षप्रवेश

कणकवली :

जिल्ह्यात निवडणुकीची हवा जोर धरत असताना कणकवली तालुक्यात भाजपचा जनाधार अधिक बळकट होत आहे. हरकूळ बुद्रुक सुतारवाडी येथील उबाठा सेनेच्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर ठेवलेला विश्वास आणि विकासमुखी भूमिकेने प्रेरित होऊन हा सामूहिक प्रवेश झाला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये अतुल मेस्त्री, दीपक मेस्त्री, अजय मेस्त्री, प्रमोद मेस्त्री, प्रवीण मेस्त्री, महेश मेस्त्री, लक्ष्मण मेस्त्री, जयदीप मेस्त्री, संदीप मेस्त्री, प्रकाश मेस्त्री, बाळकृष्ण मेस्त्री, रवींद्र मेस्त्री, सुवास मेस्त्री, प्रशांत मेस्त्री, कमलेश मेस्त्री आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.

या प्रसंगी माजी सभापती बाबासाहेब वर्देकर, राजू पेडणेकर, चंद्रकांत परब, तुकाराम खोचरे, परशुराम घाडीगावकर, उमेश सापळे, इमरान शेख, मामा माणगावकर, बाळू मोर्ये, निलेश तेली, सचिन तेली यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा