You are currently viewing जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १४ व १५ रोजी निवड चाचणी…

जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १४ व १५ रोजी निवड चाचणी…

सावंतवाडी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा होत आहे. यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १६, १९ व खुल्या गटातील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी १४ व १५ फेब्रुवारी रोजी येथील जिमखाना मैदानावर होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा संघासाठी होणाºया या खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन सचिव उत्तम वाडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या प्रसिद्धी पत्रकात वाडकर यांनी म्हटले आहे की, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता १६ वर्षाखालील तर दुपारी २.३० वाजता खुल्या गटातील खेळाडूंची निवड होणार आहे. १५ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता १९ वर्षाखालील खेळाडूंची निवड होणार आहे. सर्व खेळाडूंनी निवडीसाठी येताना जिल्ह्याजील रहिवासी व वयाचा पुरावा सोबत आणावयाचा आहे. १६ वर्षाखालील मुलांची जन्मतारीख १ सप्टेंबर २००४ तर १९ वर्षाखालील मुलांची जन्मतारीख १ सप्टेंबर २००१ असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंनी या निवड चाचणी प्रक्रियेत भाग घेऊन राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याच्या नेतृत्वाखाली संधी घ्यावी व अधिक माहितीसाठी उत्तम वाडकर -९४२१०८४०६० या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष बाळा चोडणकर व सचिव उत्तम वाडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 9 =