मन हे विचारांचे वारूळ,
दिसे भक्कम बाहेरूनी,
जरी आतून… पोकळ…
मन हे विचारांचे…..
इमल्यावरी इमले चढले,
थरावर थर रचिले सुंदर,
सुखाचे कण आणुनी बांधिले,
मुंग्यांनी मातीचे हे देऊळ.
मन हे विचारांचे….
दुःख चिंता आणिक भीती,
साप बनूनी मनांत राहती.
मुंग्यांचा अधिवास तो आंत,
सापाचे नुसतेच वावटळ.
मन हे विचारांचे…
ढासळती कडे वारुळाचे,
तरीही भय हे हृदयी वाटे.
रिते मन घर सैतानाचे,
हरोनी जन काढती पळ.
मन हे विचारांचे…
मनास नसती कडे न भिंती,
चिंता त्यास अंती पोखरती.
उठता वादळ कोसळते मन,
विचारांचे मनी गुंतते जाळं.
मन हे विचारांचे वादळ…
दिसे भक्कम बाहेरूनी…
जरी आतून…पोकळ..!!
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६