You are currently viewing आता कसं वाटते

आता कसं वाटते

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य निवृत्त पोलिस अधिकारी लेखक-कवी वासुदेव खोपडे यांची अप्रतिम काव्यरचना

लख लखत्या उन्हात
मागून पुढून शेकते
अन घेन्न रे बाबू
आता कसं वाटते !!

होते अंगाची लाही लाही
लागती घामाच्या धारा
दिशा दाही होती गरम
अन बंद होते वारा !!

पाह्य उन्हाचा पारा
रोज वरवर जाते
आभायातला भास्कर
का धरणी वर येते ?

मले वाटते कर्माचा
आपला मेळच चुकला
आपल्या मुळे निसर्गाचा
सारा समतोल हुकला !!

भूगर्भातील पाण्याचा
उपसा आपुन केला
पडणाऱ्या पावसाचा
जिरवा,मुरवा नाही केला !!

वृक्षारोपण तुम्ही आम्ही
फक्त फोटो पुरतं केलं
कळलं नाही आम्हास
रोपटं पाण्याविना मेलं !!

वृक्षा विना सारं जीवन
खरचं रुक्ष आहे गड्या
सांग कितीक बोलावशील
तू प्राणवायूच्या गाड्या !!

पेटली बुडाखाली आग
कशी धगधग जयते
अन घेन्न रे बाबू
आता कसं वाटते !!

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556

प्रतिक्रिया व्यक्त करा