You are currently viewing कणकवली भाजी मार्केट प्रश्नी नगरपंचायतने ग्लोबल असोसिएटला दिलेली कलम ५४ची नोटीस उच्च न्यायालयाकडून रद्द

कणकवली भाजी मार्केट प्रश्नी नगरपंचायतने ग्लोबल असोसिएटला दिलेली कलम ५४ची नोटीस उच्च न्यायालयाकडून रद्द

कणकवली :

कणकवली शहरातील नगरपंचायतच्या भाजीमार्केट आरक्षित जागेवर बांधण्यात येत असलेल्या भाजी मार्केटच्या इमारतीला नगरपंचायतीने बजावलेली एमआरटीपी ॲक्टची कलम ५४ ची नोटीस उच्च न्यायालयाने रद्द ठरवत याचिकाकर्ते ग्लोबल असोसिएटला दिलासा दिला आहे. त्याचबरोबर कायदेशीर बाबींची पूर्तता करत नगरपंचायतने पुन्हा नव्याने नोटीस बजावण्याची ही मुभा कायम ठेवली आहे. भाजीमार्केट इमारतीच्या बांधकाम प्रश्नी ग्लोबल असोसिएटतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर नुकतीच सुनावणी घेण्यात आली. नगरपंचायतने जर ग्लोबल असोसिएटच्याविरुद्ध निर्णय घेतला तर तो निर्णय ग्लोबल असोसिएटला कळविल्यापासून चार आठवडे त्याची अंमलबजावणी करू नये असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =