ॲड.निता सावंत-कविटकर यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल
आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांची शक्ती प्रात्यक्षिक रॅली
सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने आज दमदार शक्ति प्रदर्शन करत नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली. माजी नगराध्यक्षा व शिवसेना नेत्या ॲड. निता सावंत–कविटकर यांनी नगराध्यक्षपदासाठी, तसेच नगरसेवक पदांसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या शक्ति प्रदर्शनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले. अर्ज दाखल करताना जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख बबन राणे, दिनेश गावडे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अशोक दळवी आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना उत्साह भरून देताना आमदार केसरकर यांनी “नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीत शिवसेना भक्कम विजय मिळवेल,” असा विश्वास व्यक्त केला.
उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर व शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनीही विजयाची खात्री व्यक्त करत शहर विकासाचा निर्धार व्यक्त केला.

