*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनघा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम बालकविता*
*बालपण*
चला पुन्हा एकदा बालपण जगूया
रंगीबेरंगी फुगे पाहताना
याच रंगाचा फुगा हवाय
म्हणून परत हट्ट करू या
चला पुन्हा बालपण जगूया… … १
रिमझिम रिमझिम पावसात
चिंब ओले भिजताना
सर्दी खोकला झाल्यावर
आई-बाबांचा ओरडा खाऊया
चला पुन्हा बालपण जगूया. … .. . २
पेरू कैऱ्या तोडायला
पुन्हा झाडावर चढू या
आवळे चिंचा बोरे
लपून छपून खाऊया
चला पुन्हा बालपण जगूया… … .. ३
वर्गात मित्रांची खोडी काढताना
शिक्षकांनी दोघांना बघताना
वर्गा बाहेर काढल्यावर
ओणवे उभे राहू या
चला पुन्हा बालपण जगूया. … … ..४
घरी हल्ला हल्ला करताना
ताईने आईला नाव सांगताना
खोटे खोटे रडून झाल्यावर
आईच्या कुशीत शिरूया
चला पुन्हा बालपण जगूया. ..,…….. ५
सौ. अनघा अनिल कुळकर्णी
पुणे. 🙏 ९३२३४९१११३
