शेगांव (गुरुदत्त वाकदेकर) :
संतांची पावन नगरी शेगांव येथे महाराष्ट्र योगशिक्षक संघाचा महायोगोत्सव २०२५ – दि. ११ आणि १२ नोव्हेंबर २०२५ रोजी अतिशय उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. राज्यातील सर्व योगशिक्षक एकाच व्यासपीठावर येऊन अनुभव, विचार व ज्ञान यांची देवाणघेवाण करावीत आणि सर्व जिल्ह्यांमध्ये सुसंवाद वृद्धिंगत व्हावा, हा या महायोगोत्सवामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन योगविद्या गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वासराव मंडलिक गुरुजी यांच्या शुभहस्ते झाले. दोन दिवस चाललेल्या या महायोगोत्सवात योगविषयक अनेक व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले. सहभागी सर्व योगशिक्षकांसाठी हा अनुभव प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि आत्मिक उन्नती देणारा ठरला. शेगांवच्या आध्यात्मिक वातावरणात योगाचे तत्त्वज्ञान आणि साधनेचा संगम साधला गेला.
या महायोगोत्सवात मुंबई जिल्ह्यासह राज्यभरातून तब्बल १२०० योगशिक्षक सहभागी झाले. विशेषतः मुंबई जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये मुंबई जिल्हा उपाध्यक्षा मनुजा चव्हाण, महासचिव कृष्णकुमार शिंदे, सचिव हिरा गणवीर, कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर, मीडिया प्रभारी अमित चिबडे, तसेच सदस्य भारती कवनकर, सुनीता कांबळे, दिलीप घाडगे सर, प्रभा शेट्टी, कांचन राणे, वर्षा शर्मा, जयदीप कनकिया, राखी सोनवणे, सोनल पिंगळे, सोनाली चव्हाण, वैशाली कराड, मनीषा गोहिल, भानुदास मकदूम, लक्ष्मीबेन गजरा, कविता पतंगे, बाबुराव घाडगे, संगीता घाडगे, स्वाती सावंत आणि अनिल सावंत यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय होता.
कार्यक्रमास महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे मुंबई जिल्हा अध्यक्ष व राज्य कोषाध्यक्ष संतोष खरटमोल यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. महायोगोत्सवाच्या निमित्ताने योगसाधनेचे महत्त्व, शारीरिक व मानसिक आरोग्य वृद्धीचा संदेश आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडले. सहभागी सर्व योगशिक्षकांनी पुढील काळात योग प्रचार, प्रशिक्षण आणि आरोग्य जनजागृतीचा संकल्प घेत, या महायोगोत्सवाला यशस्वीतेचा नवा अध्याय जोडला.
