You are currently viewing दोडामार्ग, मणेरी गावचे सुपुत्र रवींद्र करमळकर यांना मुंबै गौरव पुरस्कार प्रदान….

दोडामार्ग, मणेरी गावचे सुपुत्र रवींद्र करमळकर यांना मुंबै गौरव पुरस्कार प्रदान….

दोडामार्ग

जीवनागार फाऊंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रातील ३२ नामांकित व्यक्तींना महापौर निवासस्थानी मुंबै गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जीवनागार फाऊंडेशनच्या वतीने सन २०२०-२१ या वर्षीचा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दोडामार्ग मणेरी गावचे सुपुत्र रवींद्र करमळकर यांना ”अटल गौरव पुरस्कार”मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व माजी महापौर व विद्यमान स्थायी समिती अध्यक्षा श्रद्धा जाधव यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
रवींद्र करमळकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका दोडामार्ग मधील मणेरी गावच सुपुत्र असून सध्या आरसीएफ मध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करीत आहेत. कब्बडी या खेळात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना सन १९९० साली महाराष्ट्र शासनाच्या कबड्डी या खेळ प्रकारात “शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच अध्यक्ष ऍड. नकुल पार्सेकर यांच्या अटल प्रतिष्ठान च्या वतीने खासदार श्री . सुरेश प्रभू यांच्या हस्ते रवींद्र करमळकर यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याकरिता “अटल गौरव पुरस्कार” देवून गौरविण्यात आले.
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नविनचंद्र बांधीवडेकर व भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, कोकण विभाग, सीईओ व भंडारी समाज महासंघ, सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख राजन रेडकर यांनी रवींद्र करमळकर यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याकरिता संस्थेच्या वतीने शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा