You are currently viewing कविता आणि कवींच्या सहवासाचे मंत्रमुग्ध क्षण – अरुण वि.देशपांडे, पुणे

कविता आणि कवींच्या सहवासाचे मंत्रमुग्ध क्षण – अरुण वि.देशपांडे, पुणे

*पलपब प्रकाशन आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलन “जुळती मनाची स्पंदने २०२५” थाटात संपन्न*

पुणे:

रविवार ०९ नोव्हेंबर, २०२५ खडकी – पुणे येथे डॉ.ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन व पलपब – प्रकाशन – अहमदाबाद (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने-आयोजित “जुळता मनाची स्पंदने” राज्यस्तरीय कवी संमेलन “२०२५” थाटात संपन्न झाले.

या राज्यस्तरीय कविसमेलनासाठी व्यासपीठावर “कवी संमेलनाचे अध्यक्ष ” म्हणून श्री अरुण वि देशपांडे उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष जेष्ठ साहित्यिक व माजी प्राचार्य श्री गणपतराव कणसेसर- कराड, उद्घाटक- चित्रपट-क्षेत्रातील श्री.अमोल नाडकर्णी- (पु.ल.देशपांडे यांचे नातू),-पुणे, मुख्य अतिथी- आयेशा सय्यद- डायरेक्टर- सेडोर इंटरनॅशनल, मेंबर- मुळे फाऊंडेशन-पुणे आदी मान्यवर आसनस्थ होते.

या कवी संमेलनात राज्यातील विविध भागातून आलेल्या, उपस्थित तीस कवी-कवयित्री यांनी आपापल्या कवितांचे उत्तम सादरीकरण केले. पलपब प्रकाशनच्या प्रकाशिका सौ.लीना पाटील आणि त्यांच्या टीमने नेटके आयोजन करून राज्यभरातील कवी-कवयित्रींना सादरीकरण संधी देत, या सर्वांचा स्मृतीचिन्ह-सन्मानपत्र देऊन गौरव केला. यावेळी साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, पलपब साहित्यपीठ पुरस्कार, पलपब साहित्य गौरव पुरस्कार” आणि पलपब समीक्षा संग्राम २०२५” असे विविध उपक्रमही संपन्न झाले.

डॉ.ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशनच्या महर्षीं वाल्मिकी ग्रंथालय- नेहरू गार्डन-आंबेडकर नगर खडकी-पुणे येथे हे राज्यस्तरीय कवी संमेलन संपन्न झाले. मुळे फाउंडेशनच्या – आयेशा सय्यद, रियान पिरजादे यांनी संमेलन आयोजनात महत्वाची सहकार्य भूमिका बजावली. पलपब प्रकाशनाच्या लीना पाटील मॅडम, सूत्र-संचालन-निवेदन-लेखिका विद्या चौगुले, कवयित्री -सुरक्षा पाटील यांनी केले. आयोजकांनी उपस्थित सर्व कवी कवयित्री आणि सहकारी या सर्वांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा